बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”

सांगली | जयंत पाटील यांना आगामी 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील इस्लामपूर येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल याठिकाणी एका कार्यक्रमात बोलत होते.

राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा परमेश्वराने एक आशिर्वाद दिलाय. पण कार्यकर्ते बरोबर असतील 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. जर आपण आपल्यात एकजुट ठेवली असती तर ते या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण एकजुटीने काम करु, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना खासदार संभाजीराजेंवर देखील निशाणा साधला. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत.  मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचं आवाहन केलंय.

थोडक्यात बातम्या- 

कोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे

‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट

प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात; नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर 95 टक्क्यांवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More