राज ठाकरेंच्या दणक्यानंतर सरकार नमलं! तावडे म्हणाले सगळं व्यवस्थित करू!

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोलापुरच्या सभेत हरिसाल गावचं वास्तव समोर आणलं आणि भाजपचा खोटारडेपणा उघडा पडला. यावर विनोद तावडेंनी हरिसाल गावातले जे काही प्रश्न असतील ते सोडवले जातील, असं आश्वासन दिलं आहे.

गावातील जे काही तांत्रिक प्रश्न असतील ते तत्परतेने सोडवले जातील, अशी सारवासारव राज यांच्या पोलखोलीनंतर सरकारच्या वतीने तावडेंनी केली आहे.

हरिसाल गाव डिजीटल झालंय की नाही यावरून मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगला होता. राज ठाकरे हरिसाल गावात गेलेच नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. यावर राज यांनी ‘डिजीटल हरिसाल’ जहिरातीतील ‘पोस्टर बॉय’लाच मंचावर आणलं.

राज ठाकरेंनी प्रत्येक जाहीर सभेत भाजपची पोलखोल करून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-…तर हिंदुस्तान राहिलाच नसता!- फारुख अब्दुल्ला

-दत्तक मुलीने प्रियकराच्या मदतीने आई बापाचा गळा घोटला

-राष्ट्रवादी म्हणजे शेण खाणाऱ्यांची अवलाद; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

-56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट असतं- रितेश देशमुख

-सर्व चोरांचे नाव ‘मोदी’च कसे? राहुल गांधींचा सवाल