बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, चार केंद्रीय मंत्र्यांना…”

नवी दिल्ली | युक्रेन आणि रशिया (Russia-Ukraine War) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून गंगा ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी चार केंद्रीय मंत्र्यांना शेजारील देशांमध्ये पाठवलं आहे. त्यातच आता उत्तरप्रदेशातील एका सभेत बोलताना पंतप्रधांनांनी वक्तव्य केलं आहे.

युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 हजारपेक्षा अधिक भारतीयांना परत आणण्यात आले आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी चार मंत्री गेले असून सर्वोतोपरी मदत करत आहेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असंही पंतप्रधांनी म्हटलं आहे. हवाई दलालाही तैनात करण्यात आलं आहे. या बदलत्या काळात भारताला अधिक शक्तीशाली बनावे लागणार आहे. ज्यावेळेस भारत इतर देशांवर अवलंबून राहणार नाही तेव्हा भारत अधिक शक्तीशाली होईल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही लोक आत्मनिर्भर भारत अभियनाची खिल्ली उडवत आहेत. भारतीय सैन्याचा अपमान करत आहेत. भारतीय उद्योजकांच्या मेक इन इंडियाची खिल्ली उडवत आहेत, असा घणाघात यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांवर केला आहे. सोमवारी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे आणि निवृत्त जनरल व्हि. के सिंग, किरण रिजिजू यांना शेजारील देश हंगेरी, रोमानिया-मोल्दोव्हा, पोलंड आणि स्लोव्हाकिया येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

थोडक्यात बातम्या- 

Devendra Fadnavis : “अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही”

देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल, पाहा ‘तो’ व्हिडीओ

“हे सरकार बेवड्यांना अन् दाऊदला समर्पित, यांचा खरा चेहरा आता समोर आला”

“राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा भाजपचा डाव”

रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर काय परिणाम?, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More