महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणासाठी सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे, ते बहाल करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी सरकार करेल. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल. आम्ही यामध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

सरकार कुठं चुकत असेल तर जरुर सरकारला सांगू. पण सरकारला या संदर्भात पाठिंबा देऊ. तात्काळ या संदर्भातील कायदेशीर निर्णय केले पाहिजे, असंही फडणवीसांनी सांगितलंय.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणात सर्व पक्ष सोबत आहोत. यासाठी तज्ज्ञांशी संवाद सुरू असून आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या जवळ आलो आहोत. दोन दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

तज्ज्ञांशी संवाद सुरू असून मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करू- उद्धव ठाकरे

चिंताजनक! राज्यात आज 23 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न!

“80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात मग मुख्यमंत्री घरात का बसलेत?”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या