Top News महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेऊ- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन या प्रश्नावर लवकरच निर्णय घेईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन काल ‘वर्षा’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीदरम्यान खासदार संभाजीराजे यांनी ही माहिती दिली आहे.

इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुपर न्युमररी म्हणजेच शिक्षण आणि नोकऱ्यांत अधिसंख्य जागा देण्याबाबत तसेच नियुक्त्यांबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे सर्व सहकारी पूर्णपणे सकारात्मक असल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलं.

दरम्यान, या बैठकीत मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील हेदेखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

“भाजपच्या नटीने मुंबईला ‘पीओके’ म्हटले त्याच भाजपच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या विकासासाठी मुंबईत यावं लागलं”

सुपर न्यूमररी पद्धतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक- खासदार संभाजीराजे

“शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही, पवार इज पॉवर”

डाॅ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार!

“महाविकास आघाडीचं सरकार तीन पक्षांची रिक्षा म्हणता, वाजपेंयींनी तर एनडीएचा महाट्रक चालवलेला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या