Top News महाराष्ट्र मुंबई

प्रसंगी कर्ज काढू, पण दिवाळीपूर्वी वेतन देणारच; अनिल परब

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देणे ही सध्याची प्राथमिकता असून प्रसंगी महामंडाळाला यासाठी कर्ज काढावे लागले तरी चालेल, असे प्रतिप्रदान परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे.

अनिल परब म्हणाले की, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचे उत्पन्न घटले आहे. परंतू अशा परिस्थितीत देखील एसटी सुरु ठेवणे महामंडळाचे परमकर्तव्य असून घटलेल्या उत्पन्नामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगारदेखील मिळणे अशक्य झाले आहे”.

महामंडळाने राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच एसटीच्या दैनंदिन खर्चासाठी एकूण 3600 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी नियमित प्रवासी वाहतुकीसोबत, मालवाहतूक, एसपी पेट्रोल पंपावर इतर वाहनांना इंधन विक्री यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मी 3 वर्षांची असताना….’; अभिनेत्री फातिमा सना शेखचा खळबळजनक गौप्यस्फोट

“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

“2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता…”

काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या