बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2024च्या लोकसभा निवडणुकाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | देशात लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. राजकीय पक्षांकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सातत्याने सुरू असते. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2024 लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती दिली आहे. भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदार संघांवर अधिक लक्ष देणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

गुरूवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजप नेत्यांची बैठक पार पडली आहे. पुढील 17 ते 18 महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कसं काम करायचं हे या बैठकीमध्ये ठरविण्यात आले आहे. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आतापासून जनतेत काम करायचं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

राज्यात 48 पैकी 48 लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत. त्या जागांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रातल्या जागांच्या संदर्भात एक समिती तयार केल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

दरम्यान, 2014 मध्ये निवडून आल्यानंतर 2017 मध्ये आम्ही अशा प्रकारचं नविन मिशन हातामध्ये घेतलं होतं. योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत की नाही?, योजनांचा लाभ लोकांना मिळतोय की नाही?, अशा अनेक गोष्टींवर काम करण्यात येणार आहे. 48 मतदार संघामध्ये ताकदीने आम्ही लढू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘एखाद्याच्या अंगात येतं तसं संजय राऊतांच्या अंगात आलं आणि…’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ची कोट्यवधींची कमाई, आकडा ऐकून थक्क व्हाल

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी!

सर्वसामान्यांना झटका; आता नवीन गॅस कनेक्शनसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रूपये

‘अजून किती फोटो काढणार?’; मलायका अरोरा चाहत्यांवर भडकली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More