मुंबई | बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचा गटाच्या बंडाळीनंतर संपुर्ण महाराष्ट्रात शिंदे गटाच्या विरुद्ध आणि शिंदे गटाच्या पक्षात आंदोलन आणि निदर्शने केली. काही ठिकाणी शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारणे, प्रेतयात्रा काढने, जाळपोळ करणे आदी प्रकार घडले. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत एकनाथ शिंदे आणि गटाचा समाचार घेतला.
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही शिंदे गटावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात असते तर कोणत्याही बिळातून पोलिसांनी त्यांना फरफटत आणलं असतं. म्हणूनच ते घाबरुन गुवाहाटीला पळून गेले. गोरेगाव येथे उत्तर भारतीय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देसाई बोलत होते.
एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट 3 जुलै रोजी मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यांना मुंबईत घुसू देणार नाही. 72 तास मुंबई विमानतळाला घेराव घालू, असा इशारा सुभाष देसाईंनी दिला आहे.
जेव्हा शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली जाते, तेव्हा शिवाजी महाराजांच्या तलवारीची धारही शत्रूंच्या मनात भीती निर्माण करते. अशावेळी शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदार मु्ंबईत यायला घाबरणार नाहीत तर काय?, असा प्रश्न देसाई यांनी विचारला.
थोडक्यात बातम्या –
शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार?; महत्त्वाची बातमी समोर
आम्ही पाठिंबा काढून घेतोय सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा एकनाख शिंदे
शिंदे गटाला मोठा धक्का?, वकिलांनी दिला गंभीर इशारा
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल का?, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
“मी कुठेही गेलो नाही, मला मंत्रीपदाची हाव नाही, शिवसैनिक हेच आमच्यासाठी मोठं पद”
Comments are closed.