बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त विकेंडला लॉकडाऊन… ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

चंदीगड |  देशात अनलॉकिंगला सुरूवात झाल्यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. दररोज 10 ते 11 हजार नव्या रूग्णांची नोंंद होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पंजाबमध्ये वीकेंडच्या दिवशी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. संपूर्ण देशात असा निर्णय घेणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

केंद्र सरकारने लॉकडाउनच्या पाचव्या टप्पात तसंच अनलॉकिंग 1 मध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता जाहीर केली आहे. मात्र यानंतर सार्वजनिक ठिकाणांवरची गर्दी वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा देशातून हद्दपार झाला आहे, अशा आविर्भावात लोक वावरताना दिसून येत आहेत. यामुळे चिंता अधिकच वाढलेली दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर पंजाब शासनाने विकेंडला लॉकडाऊन करून चाप लावलेला आहे.

पंजाब सरकारने साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेंच दुसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांवर देखील प्रतिबंध लावले आहेत. ज्यांच्याकडे प्रवेश पास असेल अशाच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईतील ‘हा’ परिसर ठरतोय आता कोरोनाचं हॉटस्पॉट

“खासगी प्रयोगशाळांकडून चाचण्या करून घेण्यासाठी महापालिका तयार पण सवलतीचे दर द्यावेत”

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी बि-बियाणे अन् खते दिली बांधावर

कोरोना चाचण्याांसाठी आता सर्वांत कमी दर महाराष्ट्रात, तसंच महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक चाचण्या!

साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे- कृषीमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More