‘या’ कारणामुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; आत्ताच व्हा सावध

Heart Attack

Heart Attack l पुण्यामध्ये हृदयविकार हे पूर्वी साठी-पासष्टीतील आजार समजले जायचे, परंतु अलीकडे पंचविशीतील तरुणांना हार्ट ॲटॅक आणि तिशीतील तरुणांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस (blockages) आढळत आहेत. यामागे बदलती जीवनशैली, रोजच्या जीवनातील घाई, चिंता, धावपळ, काळजी आणि तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन कारणीभूत ठरत आहे. आहार, विहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्याने मानसिक ताण-तणाव वाढून हृदयाचे ठोके बिघडू लागले आहेत.

हृदयविकाराची कारणे :

उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे (diabetes) हृदयाच्या कार्यक्षमतेवर ताण येतो.
कोलेस्ट्रॉलचे (cholesterol) वाढलेले प्रमाण रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते.
लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव
स्थूलता आणि बैठी जीवनशैली
धूम्रपान, तंबाखू सेवनाने हृदयाचे आरोग्य बिघडते.
ताण-तणाव आणि मानसिक आरोग्याचा अभाव

Heart Attack l हृदयविकार टाळण्यासाठी उपाय :

दररोज चालणे, धावणे, सायकलिंग (cycling) आदी व्यायाम आवश्यक.
भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, प्रथिने आणि चांगले मेद असलेला संतुलित आहार घ्यावा.
ध्यान, योगासनावर भर देणे गरजेचे आहे.
नियमित वैद्यकीय तपासणी करावी.

पुणे जिल्ह्यातील वाढते प्रमाण :

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत (Jan Arogya Yojana) पुणे जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षांत उपचार घेणाऱ्या हृदय रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या योजनेंतर्गत सन 2020 मध्ये हृदयविकारावर उपचार घेतलेले लाभार्थी 5 हजार 534 होते, तर तीच संख्या 2024 मध्ये 11 हजार 433 इतकी वाढली आहे. सन 2020 मध्ये हृदय रुग्णांच्या उपचारासाठी शासनाच्या तिजोरीतून 28 कोटी 50 लाख रुपये खर्च झाले होते, तर 2024 मध्ये खर्चाचा बोजा तब्बल 78 कोटी 50 लाख रुपये झाला.

आकडेवारी:

वर्ष रुग्णसंख्या
2020 5534
2021 8038
2022 10176
2023 11433
2024 13616
2025 (20 फेब्रुवारीपर्यंत) 2121

News Title: Weak Heart; Heart Attack Risk Rising Due to Changing Lifestyle

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .