बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही असं ठरवलंंय”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Maharashtra Local Body Elections) ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहे. अशातच आता बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या स्थगितीवर प्रतिक्रिया दिली आहे.

न्यायालयाच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) अध्यादेशाला स्थगिती देण्याच्या निर्णयाने ओबीसी समाजाला मोठा धक्का पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुका रद्द करुन पुन्हा नव्यानं निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही असं ठरवलंंय. आता हे सिद्ध झालं आहे. महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की जर कोणी न्यायालयात आव्हान दिलं तर हा अध्यादेश टिकणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारे 27 टक्के आरक्षण स्थगित झालं आहे. या निर्णयावर न्यायालयानं म्हटलं की, जोपर्यंत ओबीसींचा निश्चित आकडेवारी न्यायालयसमोर येणार नाही. तोपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेता येणार नाही.

थोडक्यात बातम्या – 

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ?, वाचा आजचे ताजे दर

कोरोना चाचणी झाली आता आणखी स्वस्त; राजेश टोपेंची मोठी घोषणा

Omicron | ‘आगामी काळात आतापेक्षा जीवघेणी आणि भयानक साथ येणार’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

धक्कादायक! Omicron चा लहान मुलांना जास्त प्रमाणात धोका

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More