बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! ‘मनिके मागे हिते’ गाणं गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ नेटकऱ्यांना घालतोय भुरळ, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर हल्ली अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. श्रीलंकन गायिका योहानीचं गाणं सध्या इन्स्टाग्रामवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. मनिके मागे हिते हे गाणं इन्स्टाग्रामच्या रील्समधून चांगलंच चर्चेत आहे. श्रीलंकेच्या सिंहली या भाषेत आहे. या मानिके मागे हिते या गाण्याचं रानू मंडल यांच्या आवाजातील गाणं सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

रेल्वे स्टेशनवर भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलिवूडमध्ये पोहचू शकेल असा विचार रानू मंडल यांनी स्वप्नातही केला नसेल. रानू मंडल यांचं मनिके मागे हिते गाण्याचं व्हर्जन सध्या चांगलंच चर्चेत आहे. मागील काही काळात मंडल यांची लोकप्रियता कमी झाल्याचं पाहायास मिळाली होती. पण त्यांचा टीशर्ट घालून गाणं गातानाचा नवा अंदाज समोर आला आहेत.

यूट्यूबवरील प्रसिद्ध युट्यूबर Rondhon Porochoy या चॅनेलवर हा व्हिडीओ प्रसारित झाला आहे. या व्हिडीओमध्ये रानू मंडल यांनी लाल टीशर्टसह जीन्स पॅन्ट घातलेली दिसत आहे. रानू मंडल यांचा हा नवीन अंदाज नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ घालत आहे.

दरम्यान, या व्हिडीओस जवळपास 8 लाख नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर 8 हजारांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी आवडला म्हणून लाईक केला आहे. तर 3 हजांराहून अधिक नेटकऱ्यांनी आवडला नाही, म्हणून डिसलाईक केला आहे.

पहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या –

आर. आर. पाटलांच्या बंधूंचा आईसोबतच्या व्हायरल फोटोमागील कारण ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!

“व्वा रे बिट्या, तुला कुणी सांगितलं?; महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरूंगात जाईल”

“महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही चांगली कामगिरी करणारं सरकार शिवसेना देणार”

“भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 कोटीचे मालक झालेच कसे?”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करणार हे आता पाहावं लागेल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More