बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | नागपूर हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये  विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागपूरच्या अंदाजानुसार 14 आणि 15 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती , यवतमाळ भंडारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाबरोबर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतामध्ये असलेल्या पिकांचे झाली माती. ग्रामीण भागात द्राक्ष, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू ,कडबा यांचे अतोनात नुकसान झालं आहे. तर, काही ठिकाणी बेदाणा शेड उडून गेल्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे.

दरम्यान, स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम. 6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकतो.

थोडक्यात बातम्या- 

मुंबई-कोलकाता सामन्यात असं काय झालं की, शाहरूख खानला मागावी लागली माफी !

‘…तरच रेमडेसिविरचा वापर करा’; कोविड टास्क प्रमुखांनी डॉक्टरांना हात जोडून केली विनंती

“आखिर तुम केहना क्या चाहते हो?” निलेश राणेंना आठवला 3 इडियट्सचा डायलाॅग

‘महाराष्ट्र सरकारने आधार कार्ड पाहून रुग्णांवर उपचार करावे’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

धक्कादायक! डोक्यात फरशी घालून सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More