Top News पुणे महाराष्ट्र

पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Photo Courtesy- Pixabay

पुणे | राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आता पुण्यासह पुढील तीन दिवसात विदर्भातील जिल्ह्यांध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर विदर्भ लगतच्या भागातही चक्रवात प्रभाव असल्यामुळे पुढील काही दिवस त्याभागात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील दिवसात पडणाऱ्या पावसामुळे शेेती आणि अनेक पीकांचं नुकसान होणार असल्याचं हवामान खात्याकडुन सांगण्यात आलं आहे. अवकाळी पावसामुळे ठंडी वाढली आहे.

19 फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेश आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुण्याच्या हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे. तसंच पुणे परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसात संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचे संकट आहे. काल गोंदिया, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात गारपिटीची नोंद झाली आहे. तसंच आज कोकणात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“भूखंड घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचीही चौकशी करा”

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ व्यक्तीला घेतलं ताब्यात

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती वर्षे टोल वसुली करणार?’; उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या