बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यातच महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काल पुण्यात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली होती.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील काही विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सिंधूदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवातही झाली आहे.

पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांचंही यामुळे नुकसान होणार आहे.

ऐन हिवाळ्यात थंडी ऐवजी पावसाने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता सध्या राज्यातील वातावरण पुढील 24 तासांसाठी असंच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात हे होणारे अनपेक्षित बदल नागरिकांच्या चिंतेत भर पाडत आहेत. तसेच मच्छीमारांनाही हवामान विभागाने 2 दिवस मच्छीमारीसाठी अरबी समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या

“रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे”

“महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद”

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आधी स्वत:च्या मुलांना सीमेवर पाठवावे, मग….

पंकजा मुंडे भाजपवर नाराज? ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

दिलासादायक! देशात 538 दिवसानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More