राज्यात येत्या 48 तासात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

Weather Update | येत्या 48 तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता आज हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 48 तासांमध्ये राज्यातील ठाणे, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Update)

राज्यात येत्या 48 तासात पावसाची शक्यता

आज कोकणात पावसाची जोरदार हजेरी लावण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच विजांचा कडकडाटही होणार असल्याची शक्यता आहे. (Weather Update)

भारतीय हवामान विभागानुसार (Weather Update) उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. कोकण भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात येत्या 48 तासात पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. (Weather Update)

‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. आज मुंबई शहर आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आला.

कोंकण आणि मराठवाड्यात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 14, 2024

News Title – Weather Update About Heavy Rain At Maharashtra And Yellow Alert

महत्त्वाच्या बातम्या

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंचा मोठा गौप्यस्फोट!

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; येणारे दोन दिवस..

मोठी बातमी! नितीश कुमारांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात केलं दाखल

“अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला”; उद्धव ठाकरेंनी डिवचलं

SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका; बँकेने घेतला मोठा निर्णय