गुड न्यूज! राज्यात ‘या’ दिवशी मान्सून दाखल होणार

Weather Update | केरळमध्ये यंदा मान्सून लवकरच दाखल झाला आहे. यामुळे यंदा राज्यात पावसाचे आगमन देखील लवकर होणार असल्याची माहिती समोर येताना दिसत आहे. येत्या 4 जून रोजी कोकणात पाऊस दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने (Weather Update) दिली आहे. 6 जूननंतर पुण्यात मान्सून दाखल होणार आहे. केरळला मान्सून पोहोचल्यानंतर तो आधी कोकणात पोहोचतो. त्यानंतर राज्यभरात पाऊस जाण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.

मान्सून केरळनंतर कोकणात आल्यानंतर मुंबईमध्ये दाखल होतो. मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर तो राज्यभरात दाखल होतो, हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज (Weather Update) व्यक्त केला असल्याची माहिती समोर आली आहे.

रेमल या चक्रीवादळामुळे मान्सून बंगालच्या उपसागरात सक्रीय झाला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला. आता पुढील मान्सूनची दमदार सुरूवात पाहायला मिळणार आहे. मान्सूनमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा अधिक मजबूत होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. (Weather Update)

मान्सूनसाठी अनुकूल वातावरण

पुणे हवामान विभागाचे हवामानशास्त्र डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सांगितलं, जून महिना सुरू झाल्यामुळे या महिन्यात जो पाऊस पडतो तो मान्सूनचा समजला जाईल. सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोशक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यात 3 जून रोजी, कोकणात 4 जून रोजी दाखल होईल. तर पुण्यात 6 जून रोजी मान्सून दाखल होणार आहे. (Weather Update)

विदर्भात 45 अंशी तापमान पार

मान्सून दाखल होण्याच्या बातमीमुळे कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे. तसेच विदर्भात 45 अंशावर तापमान गेलं आहे. शुक्रवारी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2 जूनपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

News Title – Weather Update About Maharashtra Monsoon News Update

महत्त्वाच्या बातम्या

बीडची जागा कोण जिंकणार?; एक्झिट पोल्सचा आश्चर्यकारक अंदाज

पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला उडवलं; पुढं जे झालं ते..

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार; वाचा एक्झिट पोलचा अंदाज

पुण्याची जागा कोण जिंकणार?, सर्वच्या सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव

देशात भाजपला किती जागा मिळणार?, प्रशांत किशोर यांचा नवा धक्कादायक अंदाज