Weather Update | मुंबई, पुणे शहरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. याबाबत आता हवामान विभागाने (Weather Update) मोठी अपडेट दिली आहे. पुणे शहरातील काही भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यासह नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत मान्सूनची हजेरी
मुंबई आणि मुंबई शहराच्या उपनगरांमध्ये देखील मान्सूनने हजेरी लावली. सध्या मुंबई आणि मुंबई शहराच्या उपनगरांमध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याची शक्यता आहे. इथे कमाल तापमान हे 34 अंश तर किमान तापमान हे 27 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं आहे. (Weather Update)
कोकण भागातील दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रांमधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. (Weather Update)
‘या’ जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी
तर दुसरीकडे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांचा कडकडटासह मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता आहे. (Weather Update)
यंदाच्या मान्सून हंगामात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. यामुळे आता पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरूवात केली आहे.
News Title – Weather Update About Monsoon In Maharashtra News
महत्त्वाच्या बातम्या
राज्यातील पोलीस भरतीबाबत देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!
पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालमाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई
“माझ्या शरिरावर टॅग, शिवाय त्या रात्री झोपायला…”, करिश्मा कपूरने केला गौप्यस्फोट
मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली
सानिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणार?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल