मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Weather Update | उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा विपरित परिणाम लोकांवर होताना दिसत आहे. चातकाप्रमाणे प्रत्येकजण मान्सूनची वाट पाहत आहे. मात्र आता मान्सूनची प्रतिक्षा संपली आहे. मान्सूनने केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी दाखल झाला. हवामान विभागानं याबाबतीत एक ट्विट केलं होतं. (Weather Update)

नैऋत्य मोसमी मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे, ईशान्य भारताच्याही बहुतांश भागातही मान्सूनने प्रवेश केला असल्याची माहिती हवामान खात्याने ट्विट करत दिली आहे. (Weather Update)

10 जूनपासून मान्सून राज्यात दाखल होणार

काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे. अशातच आता मान्सूनच्या प्रगतीला हवामान पोषक तयार होत असून, आता मोसमी वारे हळू हळू आगेकूच करत आहेत. यामुळे आता मोसमी वारे हे केरळमध्ये दाखल झाले असल्याची माहिती हवामान विभागाकडून (Weather Update) देण्यात आली. येत्या 10 जूनपासून मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचं सांगितलं आहे.

50 हून अधिक विद्यार्थी उष्मघाताने बेशुद्ध

सध्या राज्यात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने नको नको केलं आहे. उष्णतेनं अनेकांना शारिरीक त्रास होत आहे. काल परवा तर बिहारमध्ये एका विद्यालयात 50 हून अधिक विद्यार्थीनी उष्मघाताने बेशुद्ध पडल्या होत्या. (Weather Update)

दरम्यान हवामान खात्याने यंदा मान्सून लवकरच राज्यात दाखल होईल, अशी माहिती दिली आहे. कारण यंदाच्या वर्षी मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. यामुळे यंदाच्या शेतीसाठी मुबलक पाण्याचा साठा होऊ शकतो.

तसेच गतवर्षी अवकाळी पावसाचे अधिक प्रमाण होते. त्यानंतर मान्सून हा कमी प्रमाणात झाला. यामुळे पाण्याची समस्या जाणवू लागली होती. मुंबई आणि पुणेसारख्या शहरात पाणी टंचाई जाणवू लागली. मात्र यंदाच्या मान्सूननंतर पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

News Title – Weather Update About Monsoon News

महत्त्वाच्या बातम्या

किंग खानला हरवून दीपिका पदुकोण बनली ‘क्वीन’! पाहा IMDb Top लिस्ट

शिक्षक व पदवीधर निवडणुक नेमकी कधी? तर आचार संहिता कधी लागू होणार; जाणून घ्या A टू Z माहिती

पोर्शे कार अपघात प्रकरणात आणखी एक व्यक्तीची एन्ट्री;…आता असं घडण्याची दाट शक्यता

मोठी बातमी! अंदाधुंद गोळीबारात माजी नगरसेवकाचा जागीच मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

पुणे पोलिसांनी कॅफेवर टाकला छापा, अंधार करुन रंगला होता धक्कादायक खेळ