Weather Update | राज्यात गेले काही दिवस तापमानात बदल होत असतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस थंडी वाढत चाललीये. दरम्यान राज्यात आणखी तीन दिवस थंडी राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे. पुणे, नाशिक आणि जालन्यातही गारठा वाढल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, मुंबईच्या तापमानाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
हवेतील खराब गुणवत्ता-
समोर आलेल्या माहितीनूसार मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब झाली आहे. मुंबईतील एक्युआय हा 118 वर पोहोचला आहे. मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रादेशिक एअरशेड धोरणाची गरज आहे, असं अभ्यासकाचं म्हणणं आहे.
स्थानिक प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबईला तटीय एअरशेडमध्ये समाकलित करण्याचा प्रस्ताव एका देशव्यापी अभ्यासाने मांडला आहे. या प्रादेशिक एअरशेडद्वारे शहरी आणि ग्रामीण प्रदूषण स्रोतास प्रभावीपणे नियंत्रित केलं जाऊ शकतं.
हवेची गुणवत्ता बिघडली?
मुंबईची हवेची गुणवत्ता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बिघडते. ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023’ च्या नुसार, जानेवारी 2023 मध्ये मुंबईतील PM 2.5 पातळीत 2022 च्या तुलनेत 23 % वाढ झाली होती. यामुळे मुंबई हिवाळ्यात जगातील सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक ठरली आहे. यावर प्रशासनाने योग्य पावलं ऊचलणं बंधनकारक आहे.
मुंबईमधील नीचांकी तापमान हे 16.8 अंश इतकं होतं. त्याची हवामान खात्याकडून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस मुंबईत अशाच प्रकारचं वातावरण असणार आहे, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
News Title : weather update for mumbaikar
महत्त्वाच्या बातम्या-
पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल करिना कपूरचं वक्तव्य; म्हणाली, “माझ्यासाठी मोठा….”
मणिपूरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर; वाचून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल
ऐश्वर्याच्या चाहत्यांना धक्का, घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब!
भाजपची मोठी रणनीती; फक्त ‘या’ नेत्यांनाच मंत्रिमंडळात संधी मिळणार?
ब्रेकिंग! PM मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ