Weather Update: येत्या पाच दिवसांत ‘या’ भागात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा
मुंबई | कडक उन्हाळा (Summer) सुरु झाला आहे. या उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे हवामान (Weather) खात्याकडूनही उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तवला जात आहे.
उत्तरेकडून दक्षिणेकडे दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेनं राज्याच्या कमाल तापमानात (Temperature) सातत्याने भर घातली आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्य (Health) सांभाळा असं आवाहन करण्यात आल आहे.
येत्या पाच दिवसांत महाराष्ट्राच्या (Maharashtra) अंतर्गत भागामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल, असा इशारा हवामान विभागनं दिला आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान सरासरीच्या 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उष्णतेचा वाढता पारा पाहून हवामान खात्यानं उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा दिला आहे. अशातच एकीकडे उन्हाची तीव्र लाट सुरु असातना दुसरीकडे मात्र काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
थोडक्यात बातम्या –
“भाजपच्या काळ्या जादूचा आमच्यावर प्रभाव पडणार नाही”
“सुशिक्षित हिंदू मुलीच मुस्लिम मुलांना पळवून नेतात”
महाराष्ट्रावर आणखी एक संकट, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे
नितीन गडकरींचं काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम,
Comments are closed.