Weather Update | मुंबई शहरावर आज भरती आणि ओहोटीचं सावट असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. 25 जून म्हणजे आज दुपारी समुद्राला भरती ओहोटी येणार असल्याची माहिती हवामान अभ्यासकाने दिली आहे. तसेच आता मुंबई महापालिकेने यावर ठोस पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं आहे. (Weather Update)
मान्सूनचा जोर ओसरला :
मुंबईत दरवर्षी जूनमध्ये येणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदाचा पाऊस हा 45-50 टक्के तूट आली आहे. हवामान विभागाकडून मुंबईत 26 जूननंतर पावसाचा जोर वाढला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईत 9 जून रोजी मान्सून दाखल करण्यात आला होता. लवकर मान्सून दाखल होऊन देखील नंतर मान्सूनचा जोर ओसरला होता. हवामान विभागाच्यावतीनं जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. (Weather Update)
मुंबईत जून महिन्यात 550 मिलीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत सांताक्रुज परिसरात पर्जन्यमान केंद्रात 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबईत मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये 2300 मिमी पावसाची नोंद आहे. भारतीय हवामान अभ्यासकांनी सध्या मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जूनच्या 26-27 तारखेनंतर पावसाचा वेग वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Weather Update)
भारतीय विभागानं पुढील 27 तारखेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Weather Update)
🗓️ २५ जून २०२४
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती- दुपारी – ०२:३६ वाजता – ४.५३ मीटर
ओहोटी – रात्री – ०८:४१ वाजता – १.६८ मीटर
🌊 भरती – (उद्या – दि.२६.०६.२०२४) – मध्यरात्री – ०२:२५ वाजता – ३.८४…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 25, 2024
मुंबईत समुद्राला भरती ओहोटी कधी येणार?
भरती- दुपारी – 02 : 36 वाजता – 4.53 मीटर
ओहोटी – रात्री – 08:41 वाजता – 1.68 मीटर
भरती – 26 जून – मध्यरात्री – 2:25 वाजता – 3.84 मीटर
ओहोटी -26 जून – सकाळी 08:13 वाजता -0.77 मीटर
News Title – Weather Update Heavy rain Come After 26 June
महत्त्वाच्या बातम्या
पोर्शे कार अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय!
सावधान! राज्यात फोफावतोय ‘हा’ संसर्गजन्य आजार; वेळीच काळजी घ्या
टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, 595 दिवसांनंतर रोहितसेना इंग्लंडचा बदल घेण्यास सज्ज
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय! महायुतीला धक्का बसणार?
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली माय मराठीतून शपथ; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल