राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस, NDRF ची टीम तैनात

Weather Update | राज्यातील कानाकोपऱ्यात मुसळधार पावसाने नको केलं आहे. या पावसाने राज्यातील विविध भागात दाणादाण उडाली आहे. मुंबईच्या उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक ठप्प पडली आहे. मुंबईत तीन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील ‘या’ भागात पावसाचा कहर

हवामान विभागाने आज सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपूरमध्ये तर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या उपनगरात पावसाने जोर धरला आहे. (Weather Update)

सई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी एनडीआरएफ टीम तैनात केली. तीन टीम मुंबईमध्ये आणि तीन टीम ही नाशिकमध्ये तैनात करण्यात आली आहे. सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे. (Weather Update)

पर्यटन स्पॉट म्हणून लोणावळ्याची मोठी चर्चा आहे. या लोणावळ्यात मागील 24 तासांमध्ये 151 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत लोणावळ्यात पावसाची नोंद ही 2173 मिलिमीटर करण्यात आली आहे. गडचिरोली मेडिगट्टा लक्ष्मी या धरणाचे सर्वच एकूण 85 दरवाजे उघडले आहेत. (Weather Update)

सकाळपासून पुणे शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे शहराला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेधशाळेकडून शहरात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. (Weather Update)

पुणे शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात पाणीसाठा

  • खडकवासला  : 74%
  • वरसगाव : 44%
  • पानशेत : 57%
  • टेमघर : 38% पाणीसाठा आहे.

News Title – Weather Update Heavy Rain In Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील!

विधानसभेपूर्वीच कॉँग्रेसला झटका! ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर?

‘मैदानात उतरा आणि ठोकून काढा’; देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

राज्यातील ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ, नागरिकांना मोठा फटका

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा, तो मित्र ठरतोय तिसरा व्यक्ती?