घरातून बाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

Weather Update | राज्यात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात विविध भागात पाऊस हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान विभागाने (Weather Update) दिला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलं आहे.

येत्या 24 तासात हवामान ढगाळ राहिल

अशातच आता आजचं हवामान कसं राहिल याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर. हवामान विभागाने येत्या 24 तासात हवामान हे ढगाळ राहिल अशी शक्यता वर्तवली आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. (Weather Update)

यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित संपूर्ण भागात महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट जारी केला आहे. मुंबईत येत्या 18 जूनपासून पावसाला सुरूवात होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. (Weather Update)

पंजाबराव डख यांचा अंदाज

तसेच मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

यंदा मान्सूनचं केरळमध्ये लवकर आगमन झाल्याचं दिसून आलं आहे. हवामान विभागाने (Weather Update) यंदाच्या वर्षी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात लवकरच हवामान विभागाने पाऊस दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भामध्ये हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 22 जूनपर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

News Title – Weather Update Heavy Rain Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

रिमझिम पावसात लोणावळ्याला जायचा प्लॅन करताय?, मग ‘या’ 17 ठिकाणांना नक्की भेट द्या

पंतप्रधानांना किस करतानाचा मेलोनी यांचा व्हिडीओ व्हायरल!

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

‘अहंकारी झाले त्यांना प्रभू श्रीरामाने…’; आरएसएसची भाजपवर बोचरी टीका

“RSS नं ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही राहणार नाही”