Weather Update | राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावासाचा इशारा

Weather Update | अवकाळी पावासानंतर आता महाराष्ट्रातील काही भागात थंडीची (Weather Update) लाट आल्याचं पहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या पावासानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

‘या’ भागांमध्ये पावासाचा इशारा

कोकण आणि विदर्भात पुढील 24 तासांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला असून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात वातावरणात बदल झाल्याने थंडीची वाट पाहावी लागली.

येत्या आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. काही भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी, राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 2, 3 दिवस हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये थंडीची चाहूल-

केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल या भागात पावसाची शक्यता आहे. तर दुुसरीकडे मुंबईमध्ये थंडीची लाट येणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

तापमानामध्ये घट-

मुंबईतल्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. त्यामुळे रात्री मुंबईकरांना थंडीची मजा घेता येणार आहे. अलिकडे मुंबईच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

News Title : weather update high winter in this state

थोडक्यात बातम्या-

Maratha Reservation | मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाचा तडकाफडकी राजानीमा

Share Market | ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

Kalicharan Maharaj | ‘राममंदिर उद्ध्वस्त…’; कालिचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Manoj Jarange | मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली

Stop Clock Rule | आता गोलंदाजांचं काही खरं नाही, आयसीसीनं आणला नवा नियम