राज्यातील ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ, नागरिकांना मोठा फटका

Weather Update | राज्यात सध्या मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. राज्यातील विदर्भात मोठ्या प्रमाणात पावसाचा हाहाकार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने दमदार हजेरी लावली. काही भागात पाणी साचलं आहे. तसेच या पावसाने दाणादाण उडवली असून अतिवृष्टी सदृश्य पावसाने नको केलं आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. (Weather Update)

चंद्रपूर जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिलपल्ली गावातील गाव तलाव फुटल्याने गावातील काही घरांमध्ये पाणी गेलं आहे. धनधान्यांची नासाडी झाली आहे. यामुळे मोठा फटका हा बळीराजाला बसला आहे. सकाळी तलावाची पाळ फुटून गावात पाणी शिरलेलं दिसलं आहे. गावातील 100 बकऱ्या आणि इतर जनवारं देखील दगावल्याचं दिसून आलं. (Weather Update)

नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना शनिवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार धो-धो धुतलं. दरम्यान अजून देखील पावसाचा जोर कायम आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात येतो. यामुळे आता स्थानिक प्रशासन आणि हवामान खात्याने वर्तवला आहे. अशातच शेतकऱ्यांनी शेतातील बि-बियाणे काढून आपल्या घरात आणून ठेवली होती.

पर्यटनास्थळी जाणं धोकादायक

सध्या राज्यात मुसळधार पावसाने नको नको केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांनी सर्व यंत्रणांनी सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या ठिकाणी असणाऱ्या नद्यांना पूरजन्य परिस्थिती आहे. पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज करणे, तसेच पर्यटनास्थळी जाण्याबाबत धोकादायक परिस्थितीची जाणीव करून देणे. (Weather Update)

रविवार असल्यामुळे वर्षा पर्यटनाला मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यांना धोकादायक परिस्थितीची वेळीच जाणीव करून देणे. तसेच अती धोकायदायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याचा सूचना देण्यात आल्या.

News Title – Weather Update In Chandrapur District Heavy Rain

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात पावसाचा कहर! गावांना पाण्याचा वेढा, शहरात वीजपुरवठा खंडित; नागरिकांचे हालच हाल

गुजरातमध्ये शाळेची भिंत कोसळली, मुलं पहिल्या मजल्यावरून थेट..; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

“UPSC सारख्या प्रक्रियेत गडबड म्हटल्यावर..”; पूजा खेडकर प्रकरणी प्रियंका गांधी संतापल्या

मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून मोठी माहिती समोर

अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?, अजित पवार गटातील आमदाराचं सूचक विधान