बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर जोरदार पावसाचं सावट, हवामान खात्याचा इशारा

पुणे | राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच पुणे, मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी झोडपून काढलं आहे.

आज महाराष्ट्रातलं हवामान ढगाळ राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. तसेच शनिवारी रात्रीपासून पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागामध्ये पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. भर उन्हाळ्यात पाऊस पडल्याने नागरिकांना जरी उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांचं या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कांदा, द्राक्ष हे शेतात पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोर जावं लागत आहे.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही यावेळी हवामान खात्याने केलं आहे.

पुण्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा धोका अजूनही कायम असून पुण्यात आज पावसाचे काळे ढग आकाशात पहायला मिळाले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली असल्याचं पहायला मिळत आहे. काल कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढल्यानंतर शेतीमालाच मोठं नुकसान झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

रुग्णसंख्या हजारात पण शिल्लक बेड बोटावर मोजण्याएवढेच; ‘या’ शहरातील विदारक परिस्थिती

गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली, वाचा सविस्तर

परीक्षा आताच घ्या अन्यथा… ; दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक

दगा देणाऱ्या पतीला खासगी गुप्तहेराद्वारे तिनं रंगेहाथ पकडलं

गतवर्षीचा वचपा काढण्यासाठी राहुलची ‘पंजाब किंग्ज’ तयार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More