राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | हवामान विभागाने राज्यातील काही भागांना मोठा इशारा दिला आहे. सध्या कडक उन्हाळा जाणवत असला तरी काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता आहे.

राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

राज्यात विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत आजपासून येत्या 18 मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.उत्तर भारतात मुसळधार पावसासह गारपीट (Weather Update) होण्याची शक्यता आहे, याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येणार आहे.

जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 17 मार्चपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्येदेखील हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम दिसणार आहे.

राज्यात तापमानात वाढ

राज्यात मागील महिन्यात जोरदार पाऊस पडला. विदर्भाकडील काही भागांमध्ये तर गारपीटीचा पाऊस झाला. यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे.

राज्यात मुंबई, पुणे सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यातच आता पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. सततच्या वतावरणीय बदलाचा आरोग्यावर देखील परिणाम दिसून येत आहे.

News Title-  Weather Update in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या –

“ब्रीजभूषण यांच्याविरोधात आवाज उठवल्यापासूनच मला…”, विनेश फोगाट संतापली

मुंबई पुन्हा एकदा अजिंक्य! चॅम्पियन संघावर पैशांचा पाऊस, रहाणेची भावनिक प्रतिक्रिया

“भाजपची गॅरंटी चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक”

“त्यांनी एकदा स्पष्टच करावं की…”, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सरकारची घोषणा