Weather Update | मोसमी पावसाचे आगमन झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड घट झाली आहे. नागरिकांना आता उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालंय. मागच्या आठडव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडूनही गेलाय.
अजूनही मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह विदर्भातील काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
‘या’ भागांना पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाने आज (12 जून) सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
याशिवाय, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा (Weather Update) आणि कोल्हापूर येथे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.
विदर्भात मान्सूनचं अजूनही आगमन नाही
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील काही भागात कोसळलेल्या पावसामुळे अनेकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. दुसरीकडे दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच विदर्भातील जलसाठयाने तळ गाठल्याचं चित्र आहे.
आता जून महिन्याचा मध्यान्ह लागला (Weather Update) असला तरी भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचं अजूनही आगमन झालेलं नाही. त्यातच भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे ठाक झाले आहेत. तर, काही तलावांची पाण्याच्या पातळीनं अगदी तळ गाठला आहे. त्यामुळे विदर्भवासीय मान्सूनच्या जोरदार आगमनाची वाट बघत आहेत.
News Title – Weather Update June 12
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत धुसपुस?; ‘या’ दोन नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा
‘ते’ अजितदादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत काय?; बजरंग सोनवणेंनी सुनावलं
मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यातील शाळेला मनोज जरांगेंच नाव देण्यात येणार
शिंदे-पवारांचा फायदा नाही, विधानसभेला भाजप स्वबळावर लढणार?
बायको, मुलगा की अन्य; अजितदादा राज्यसभेवर कोणाला पाठवणार?