Weather Update | मोसमी पावसाचे आगमन झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड घट झाली आहे. नागरिकांना आता उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालंय. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडूनही गेलाय.
आता पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं विदर्भासाठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. विदर्भामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
यासह बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. अहमदनगर, पुणे व सोलापूर तर मराठवाड्यात आज लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस तर अमरावती व वर्धा जिल्ह्यात आज वादळीवारा व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे (Weather Update) या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत पावसाने नागरिक हैराण
दरम्यान, राज्यात सध्या मॉन्सून अमरावती व चंद्रपूरपर्यंत पोहोचला आहे. तर मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट् देखील मॉन्सूनने व्यापला आहे. नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम येथे सध्या मॉन्सून सक्रिय झाला आहे.
दुसरीकडे मुंबईत सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. काल मुंबईत सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र, या पावसामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी पाहायला (Weather Update) मिळाली. पुण्यातही मागील आठवड्यात झालेल्या पावसाने नागरिकांचं बरंच आर्थिक नुकसान झालं होतं.
News Title – Weather Update June 14
महत्त्वाच्या बातम्या-
सुनेत्रा पवारांना खासदारकी देणं ही घराणेशाही नाही का?, छगन भुजबळ थेट म्हणाले…
अजित पवार गटाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला; थेट..
शरद पवार गट ‘तब्ब्ल’ एवढ्या जागांवर निवडणूक लढवणार; जयंत पाटलांनी सांगितला आकडा
“SIT खरंच रद्द केली की शेंगा हाणल्या..”; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटलांचा टोला
“…ताई आज अचानक हिंदू कशी झाली?”, केतकी चितळेच्या वक्तव्याचा किरण मानेंनी घेतला समाचार