हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; येणारे दोन दिवस..

Weather Update | राज्यभरात सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडून गेला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून बराच दिलासा मिळाला आहे. आता हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

राज्यात सध्या मॉन्सून अमरावती व चंद्रपूरपर्यंत पोहोचला आहे. तर मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट् देखील मॉन्सूनने व्यापला आहे. नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम येथे सध्या मॉन्सून सक्रिय झाला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

अशात हवामान विभागाने काही भागाला यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात आजपासून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस तर अमरावती व वर्धा जिल्ह्यात आज वादळीवारा व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे (Weather Update) या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मॉन्सून वेळेत दाखल झाल्याने शेतकरी आनंदी

हवामान विभागाने अहमदनगर, पुणे व सोलापूर तर मराठवाड्यात आज लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. येथे तशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्याच्या विविध भागात सध्या (Weather Update) चांगला पाऊस पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. यामुळे शेतकरी देखील सुखावला आहे. शेतकऱ्यांनी शेती कामाला देखील सुरुवात केली आहे. मॉन्सून वेळेत दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम यावेळी चांगलाच फुलणार असल्याचं दिसतंय.

News Title – Weather Update June 15 

महत्त्वाच्या बातम्या-

“अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला”; उद्धव ठाकरेंनी डिवचलं

SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका; बँकेने घेतला मोठा निर्णय

अखेर मलायकाने प्रेग्नंसीबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली ‘या महिन्यात बाळाला….’

उपोषण स्थगित केल्यानंतर अंतरवाली सराटीतून मोठी बातमी समोर!

आलिया भट्टचा पुन्हा नको तसला व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, “…हे भयानक”