Weather Update | हवामान विभागाने आज (16 जून) काही भागांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागांत आज मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. आज पुन्हा राज्याच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाची मोठी अपडेट
मराठवाड्यात दिवसभर ऊन तर रात्री पाऊस पडत आहे. आज येथे हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
दरम्यान, मान्सूनने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मजल मारली आहे. मात्र, विदर्भात मान्सूनची वाटचाल अजूनही मंदावलेली दिसत आहे. संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय होण्यास आणखी (Weather Update ) तीन चार दिवस लागण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा
दुसरीकडे हवामान विभागाने कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तुन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे (Weather Update ) या जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
News Title – Weather Update June 16
महत्त्वाच्या बातम्या-
ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलं, प्रकाश शेंडगेंचा राज्य सरकारला गंभीर इशारा
मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती
आज ‘या’ राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल, मोठा धनलाभ होणार
राज्यात येत्या 48 तासात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
धनंजय मुंडेंनी केलं पीडित कुटुंबीयांचं सांत्वन, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली