पुढील 48 तासांत ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Weather Update | राज्यात काही दिवस पाऊस पडल्यानंतर या दोन-तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सध्या मॉन्सूनचीदेखील गती मंदावली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे. परंतु, दोन दिवसांपासून मॉन्सूनची गती मंदावली आहे.

अशात हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे. पुढील 48 तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘या’ भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासाह पावसाची शक्यता

अरबी समुद्रावर मान्सूनचे वारे वाहत असल्याने मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यासोबतच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होईल. यावेळी वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रतितास असेल. येथे हलका (Weather Update) ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

इतर राज्यांमधील पावसाची स्थिती

याचबरोबर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासाह पाऊस होईल. येथे वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास असेल. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

इतर राज्याबाबत बोलायचं झाल्यास, दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल येथे पुढील (Weather Update) पाच दिवस पावसाची शक्यता आहे.

News Title :  Weather Update June 18

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र हादरला! भररस्त्यात लोखंडी पान्याने वार करत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं, लोक बघत राहिले

राजकारण तापणार! शिंदे गटाच्या नेत्याचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

“ही घराणेशाही नाही, शरद पवार आणि अजित पवारांचं कुटुंब वेगवेगळं”

इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सरकार देणार सबसिडी?, मोठी माहिती आली समोर

मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका अलका याग्निक दुर्मिळ आजारानं त्रस्त, दोन्ही कान..