राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी

Weather Update | या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. बऱ्याच ठिकाणी आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे. आज 22 जूनरोजी हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

विदर्भातील सर्व जिल्ह्यात 25 जून पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.तसंच आज महाराष्ट्रात मध्य भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. यावेळी 64.5 मिमी ते 204.4 मिमी सह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने वर्धा, वाशिम, यवतमाळ, जालना, परभणी, अमरावती, भंडारा, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला (Weather Update) आहे.

मुंबई आणि पुण्यातही जोरदार पावसाचा इशारा

या सर्व भागामध्ये पुढील चार दिवस वादळी वारे आणि विजांचा कडकडटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसंच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यासोबतच मुंबई आणि पुण्यात घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे (Weather Update) वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

News Title – Weather Update June 22 

महत्त्वाच्या बातम्या-

“जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ, त्यांनी नेहमीच ओबीसीविरोधी भूमिका घेतली”

शिवभक्तांनो उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी; जाणून घ्या अधिक

केसातील कोंड्यापासून सुटका हवीये? तर ‘या’ आयुर्वेदिक गोष्टी केसांना लावा

“मनोज जरांगेंची उंची आहे का?, कोण कोणाला पाडतं दाखवून देऊ”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

ह्युंदाई कंपनीची ‘ही’ इलेक्ट्रिक कार मार्केटमधून बंद होणार