पावसाळ्यात लोणावळ्यातील ‘या’ स्पॉटला जाण्याचा मोह आवरा; अन्यथा…

Weather Update | राज्यभरात मुसळधार पावसाने नको केलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर लोणावळ्यातील अनेक स्पॉटला जाण्यापासून पर्यटकांना प्रशासनाने मोह आवरण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा अशा मुसळधार पावसात पर्यटक आपल्या जीवाला मुकतील. पुणे शहरातील रस्त्यांना पाण्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. तसेच वाहनांना प्रवास करणं कठीण होताना दिसत आहे. जीवापेक्षा पर्यटन मोठं नसल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. लोणावळा येथे देखील ढगफूटी सदृश्य पावसाने जोर लावला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अनेकदा लोणावळा येथे पावसाळ्यात पर्यटक आपली उपस्थिती दाखवतात. अनेक धबधब्यांवर जात निसर्गाचा आनंद घेत असतात. मात्र आता प्रशासनाने लोणावळ्यातील काही स्पॉटला जाण्यापासून मोह आवरण्यास सांगितलं आहे. अन्यथा होत्याचं नव्हतं होऊ शकतं. (Weather Update)

हवामान विभागाने येत्या काही तासांमध्ये पुणे जिल्ह्यातील भोर, मुळशी, वेल्हा, हवेली तालुक्यात खडकवासला परिसरात अतिमुळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे आता शाळांना प्रशासनाने सुट्टी दिली आहे. अशातच आता पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी केली आहे. (Weather Update)

लोणावळा परिसरामध्ये 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचलं आहे. लोणावळ्यातील सहारा पूल, भुशी डॅम आणि लाईन्स पॉईंट या परिसरामध्ये पावसाने कहर केला आहे. लोणावळ्यातील धबधबे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. (Weather Update)

सुरक्षेच्या कारणाने पर्यटन स्थळी जाण्यास मज्जाव

सुरक्षेच्या कारणाने या सर्व परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याशी लोणावळा पोलिसांनी चेक पोस्ट लावत सर्व पर्यटक वाहने आणि इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (Weather Update)

तसेच मावळ आणि मुळशी येथे  25 जुलै ते 29 जुलै दरम्यान सर्व पर्यटन स्थळे सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आले. लवासा सिटी परिसरात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचे समोर येत आहे. त्यामध्ये तीन बंगले गाडले गेले आहेत.

News Title – Weather Update Lonavala Tourist Avoid Temptation Marathi News Update

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पावसाचा धिंगाणा, तीन जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

पुण्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती, अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर

पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड रोडवर धडकी भरवणारी परिस्थिती, अनेक भाग गेले पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर

“बिहारला पूरस्थितीसाठी 18 हजार कोटी, महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?”