Weather Update | राज्यात मान्सूनची अनेकजण वाट पाहत आहेत. मान्सून सध्या केरळमधून तमिळनाडूत पोहोचला आहे. येत्या 48 तासात राज्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यात पुढील दोन दिवस उन्हाच्या झळा बसणार असून त्यानंतर पावसाची हजेरी पाहायला मिळेल. (Weather Update)
‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज 2 मे रोजी तुरळक प्रमाणात ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Update)
कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/9o1ETNoiBC
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 31, 2024
सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची सरी कोसळण्याचा अंदाज आहे. 3 आणि 4 जून रोजी रायगड आणि रत्नागिरीत पावसाची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये 4 आणि 5 जूनला पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Weather Update)
‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण दमट परिस्थिती पाहायला मिळत आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. (Weather Update)
#हवामानअंदाज
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर उद्या (२) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. #WeatherUpdate pic.twitter.com/Z3BTxu6aMw— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 1, 2024
उष्णतेनं राज्यात नको नको केलं आहे. या उष्णतेनं अंगाची लाहीलाही होत असून अनेकजण मान्सूनची वाट पाहताना दिसत आहेत. सध्या मान्सून हा केरळमधून तमिळनाडूत दाखल झाला. लवकरच राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
या उन्हाळ्यात उष्मघाताचा फटका बसला आहे. अनेकांना या उष्मघाताचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांआधी अभिनेता शाहरूख खानला देखील उष्मघाताचा सामना करावा लागला होता. तसेच बिहारमध्ये एका विद्यालयातील विद्यार्थींनींना उष्मघाताने चक्कर आली होती.
News Title – Weather Update Maharashtra About Monsoon
महत्त्वाच्या बातम्या
राज्यातील एक्झिट पोलवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘अशा’ व्यक्तींना आयुष्यात कधीच यश मिळत नाही; ‘या’ सवयी आजच बदला
‘नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर…’; रवी राणांच्या वक्तव्याने खळबळ
जान्हवी कपूरने सर्वांसमोरच बॉयफ्रेंड शिखरला…. ; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री रवीना टंडनचा मद्यधुंद अवस्थेतला ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल