सावधान! ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी 

Weather Update | या आठवड्यात पावसाने राज्यभरात काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. मागच्या आठवड्यात पावसाने बऱ्याच भागात धुमाकूळ घातला होता. यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतून ठप्प झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. अशात हवामान विभागाने पुन्हा एकदा कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि (Weather Update) विदर्भाला महत्वाचा इशारा दिला आहे. 

या ठिकाणी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच काम असेल तरच घराबाहेर पडावे असे, आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

याचबरोरबर मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडेल, असा अंदाज (Weather Update) आहे.

राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

राज्यात येत्या 4 ऑगस्टपर्यंत पाऊस कायम राहणार असून पावसाचा जोर देखील वाढणार आहे. तर, ५ ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यभरात गेल्या काही दिवसांत जोरदार (Weather Update) पाऊस बरसला आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा 41 टक्के जास्त पाऊस झाला. तर, मध्य महाराष्ट्रात 45 टक्के, मराठवाड्यात 27 टक्के आणि विदर्भात सरासरीपेक्षा 36 टक्के पाऊस पडला आहे.

News Title- Weather Update Maharashtra August 1

महत्वाच्या बातम्या-

दररोज फक्त 45 रुपयांची गुंतवणूक करा, 25 लाखांचा निधी मिळवा; जाणून घ्या योजना

‘…तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत’; मिटकरींचा मनसे नेत्यांना इशारा

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा त्रस्त?, धक्कादायक सत्य आलं समोर

राज्य सरकारचा करंटेपणा, ॲालिम्पिकला जाण्यापूर्वी स्वप्निलला 50 लाखांची घोषणा करुन रुपयाही दिला नाही!

अटकेच्या भीतीने पूजा खेडकर परदेशी फरार?, मोठी अपडेट समोर