राज्यभरात पावसाचा हाहाकार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, रस्ते वाहतूकही ठप्प

Weather Update | राज्यभरात पावसाने कहर केला आहे. राज्यातील विविध भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यतील काही नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे. कोकणभाग, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस धुमशान मचावत आहे. यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये नागरिकांचे हाल झाले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुणे जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Update)

उल्हास नदीने पाण्याची पातळी ओलांडली

पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण मार्गावरील रायते पुलाला नदीचे पाणी लागलं आहे. यामुळे रायते पुलावरील मार्ग पाण्यामुळे बंद झाला. यामुळे वाहतूक सुविधा ठप्प पडली होती. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सध्या पावसाचा जोर वाढला असून नदी, नाले, दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड,आंबेगाव,जुन्नर येथे घाटमाथ्यावरील शाळांना सुट्टी जाहीर केली जाईल. ठाणे जिल्हा आणि सांगलीतील  जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी दिली गेली आहे. (Weather Update)

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गेली 8 दिवस पावसाची बॅटिंग सुरू आहे. वारणा आणि कोयना पाणलोट परिसरात सतत पाऊस सुरू आहे. चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या सांगली आणि कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ही 31 फूटांवर गेली आहे. (Weather Update)

पंचगंगा नदीने देखील धोक्याची पातळी गाठली आहे. पुराचे पाणी हे रस्त्यावर आलं आहे. याचा फटका हा आजूबाजूच्या गावांना बसला आहे. नदीचे पाणी हे मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावांना सर्वाधिक फटका बसत आहे. (Weather Update)

पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पावसाने हजेली लावली आहे. यामुळे पवना नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. शहराच्या काही भागावर नदीचे पाणी यायला सुरूवात झाली आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर नदीच्या भोवतालचा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

दरम्यान राज्यात मुंबई येथे देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईच्या उपनगरांमध्येही पावसाने नको नको केलं आहे. पावसाने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. इस्टर्न आणि वेस्टर्न हायवे वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच मुंबई, ठाणे, कल्याण, पुण्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

News Title – Weather Update Maharashtra Heavy Rain alert 

महत्त्वाच्या बातम्या