Weather Update | राज्यामध्ये कोकण भागात सर्वाधिक पाऊस पडतो. कोकण भागाला समुद्र सपाटी आहे. यामुळे कोकण भागात प्रत्येक मान्सूनमध्ये पाऊस थैमान घालताना दिसतो. यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरवर्षी कोकण भागात मान्सूनमध्ये नैसर्गिक आपत्ती घडताना दिसते. यंदाच्या वर्षी मान्सून सुरू झाल्यानंतर रस्त्यांवर मगरी धावताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Weather Update)
चिपळूणच्या रस्त्यावर मगरी, व्हिडीओ व्हायरल
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण भागातील नदी, नाले, तुटुंब भरून वाहताना दिसत आहेत. अशातच आता कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या रस्त्यावर मगरी आल्या आहेत. चिंचनाका येथे रस्त्याने मगरी फिरताना दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामुळे आता नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. (Weather Update)
चिपळूण येथे शिव नदीचे पाणी आता रस्त्यावर उतरले आहे. रस्त्याला पूरजन्य परिस्थिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने मगरी देखील रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. रविवारी रात्री चिंचनगर येथे एक मगर रस्त्यावर दिसून आली. ही मगर पाहताच वाहन चालकांची बोलतीच बंद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Weather Update)
थेट रस्त्यावर मगर, चिपळूणमधील चिंचनाका परिसरातील हे दुष्य pic.twitter.com/1nnWMQt97f
— jitendra (@jitendrazavar) July 1, 2024
व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं की, रस्त्यावरून मगर चालली आहे. त्या मगरीच्या बाजूने रिक्षावाला चालला आहे. अनेकजण मगरीचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत. याआधी देखील रस्त्यावर मगरी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय. (Weather Update)
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस सुरू
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस सुरू आहे. यवतमाळ शहरासह अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अडण नदीला पूर आला आहे. त्यामुळे यवतमाळ आणि दरव्हा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
News Title – Weather Update Maharashtra Konkan Chiplun In Crocodiles On The Road
महत्त्वाच्या बातम्या
तृणमूल नेत्याची भर रस्त्यात महिलेला अमानुषपणे मारहाण; व्हिडिओ व्हायरल
“हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, समझने वाले को इशारा काफी”
सूर्याच्या कॅचवरून आफ्रिकन चाहत्यांचे सवाल; माजी दिग्गज खेळाडूने दिलं जोरदार प्रत्युत्तर
महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; LPG सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त
‘वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली….’; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांनी खळबळ