ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांच्या पार; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा हायअलर्ट

Weather Update | मे महिन्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून उन्हाचा पारा वाढतच गेल्याचं दिसून आलं. विदर्भामध्ये तर काही जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 45 ते 47 अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे या भागांना उष्णतेचा हायअलर्ट देण्यात आलाय.

हवामान विभागाने 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिलाय. तर विदर्भातील ब्रह्मपुरीत प्रथमच 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा हायअलर्ट

दिवसा घराबाहेर पडणं देखील अवघड झालं आहे. देशभरात आतापर्यंत 60 जणांनी उष्माघातामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ,वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भातील तापमान (Weather Update) वाढलेलेच राहील. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

दुसरीकडे राज्यातील इतर भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील पाच दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

आज (28 मे) महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव व विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांचा (Weather Update) कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

News Title-  Weather Update Maharashtra may 2024 

महत्वाच्या बातम्या-

आंद्रे रसेल अन् अनन्या पांडेचा डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग होणार तब्ब्ल ‘इतक्या’ कोटींच्या क्रूझवर, जाणून घ्या फंक्शनचं पूर्ण वेळापत्रक

हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाबाबत मोठी माहिती समोर

“मी नोकरीच्या शोधात, माझ्या भुकेल्या पोटाची काळजी घ्यायचीये”, उर्फी जावेदचा बायोडेटा सोशल मीडियावर व्हायरल

अजितदादानंतर आता पाण्यावरून भाजप नेत्याचे विधान, “मी काय फूक मारून…”