Weather Update | मुंबई शहराला अरबी समुद्र लागून आहे. पावसाळ्यात या समुद्राच्या लाटा इतर ऋतूंच्या मानाने तीव्र आहेत. पावसामुळे मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने हाहाकार माजला आहे. याचा परिणाम हा मुंबईच्या लोकल वाहतुकीवर झाला. मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू आहे. दादर, परळ या भागात पाणी साचलं आहे. (Weather Update)
मुंबईच्या वाडिया आणि के.ई.एम.रुग्णालयाच्या परिसरात एक ते दीड फूट पाणी साचलं आहे. यामुळे अनेकांना मार्ग काढत पाण्यातून जावं लागत आहे. राजधानी मुंबईत पाणीबाणी झाल्याचं दिसून आलं आहे. अशातच मुंबई पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केलं आहे. (Weather Update)
मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून केलं आवाहन
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान, पर्जन्यस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मुंबईत होत असलेल्या पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, समुद्रकिनारी जाऊ नये, गरज असेल तर घराबाहेर पडा. कृपया काळजी घ्या आणि गरज पडल्यास घराबाहेर पडा आणि 100 नंबर दाबा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. (Weather Update)
In view of the continuous and heavy rains in Mumbai, citizens are requested to avoid going to the coastal areas and move out of their house only if necessary.
Take precautions and #Dial100 in case of emergency.
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) July 21, 2024
मुंबईत तीन दिवसात 326 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपरच्या भाटोडी कातोडी पाडा येथे दरड कोसळली आहे, सुदैवाने कोणीही जखमी नाही. काही घरांना मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
मुंबईसह चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने दमदार हजेरी लावली. काही भागात पाणी साचलं आहे. या पावसाने दाणादाण उडवली असून अतिवृष्टी सदृश्य पावसाने नको केलं आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. (Weather Update)
News Title – Weather Update Mumbai Heavy Rain Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
राज्यातील ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ, नागरिकांना मोठा फटका
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा, तो मित्र ठरतोय तिसरा व्यक्ती?
“मी अजित पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”
नागपुरात पावसाचा कहर! गावांना पाण्याचा वेढा, शहरात वीजपुरवठा खंडित; नागरिकांचे हालच हाल
गुजरातमध्ये शाळेची भिंत कोसळली, मुलं पहिल्या मजल्यावरून थेट..; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल