Weather Update | गेल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार आहे. अशातच कालपासून म्हणजेच 13 जुलैपासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. कारण मुंबईसह, भिंवडीत पावसाचा कहर सुरू आहे. कोकणातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. (Weather Update)
राज्यातील नद्या या दुथडी भरून वाहत आहेत. अशातच पुढील तीन दिवस कोकणात पाऊस सुरूच राहणार आहे. घाटमाथ्यावर पावसात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात सुरू असलेल्या पावसाने कोकण रेल्वेचा प्रवास ठप्प झाला आहे. यामळे अनेक गाड्यांना विलंब होताना दिसत आहेत. तसेच मुंबईकडून येणाऱ्या गाड्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या विलंबाने धावत आहेत. कोकण कन्या दीड तास उशिराने धावत आहेत. मडगाव एक्स्प्रेस सद्धा दोन तास विलंबाने धावत आहे. (Weather Update)
मुंबई तुंबणार?
मागील आठवड्यात देखील मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं दिसून आलं. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. अशात काल रात्रीपासून (13 जुलैपासून) पावसाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. भिंवडीतील नझराणा सर्कल, तीन बत्ती, मंडई, शिवाजी चौक या भागात घुडघाभर पाणी साचलं आहे. मुंबईतील काही सखल भागात पाणी भरण्यास सुरूवात देखील झाली आहे. भायखळा, लालबाग, परळ, दादर भागात पाऊस मुसळधार सुरू आहे.
मुंबईसह पुणे शहरात पावसाचं थैमान
मुंबईप्रमाणे पुणे शहरात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. स्वारगेट, कात्रज, पेठांच्या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यात पावसाचा जोर असाच राहिला तर धरण पाणी साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. लोणावळ्या मागील 24 तासांमध्ये 216 मिलीमिटर पावसाची नोंद जारी केली आहे. (Weather Update)
पवना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने नको केलं आहे. यामुळे पवना धरणातील पाणी साठ्यात 3.94 टक्के वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. रविवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के इतका झाला आहे. पवना धरण परिसरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Weather Update)
News Title – Weather Update Mumbai Rainy Season
महत्त्वाच्या बातम्या
ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल
माझी लाडकी बहीण योजनेत नव्याने पाच मोठे बदल, अर्ज भरण्यापूर्वी एकदा वाचून घ्या!
इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तो दिवस आता ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित!
बाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागात आज अतिवृष्टीचा इशारा
“संविधानावर खरंच प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी मनुस्मृती जाळावी”