Weather Update | महाराष्ट्रात सगळीकडेच नव्या वर्षाची जोरदार तयारी सुरु आहे. सगळेजण येणाऱ्या नव्या वर्षाची आतूरतेने वाट पाहत आहेत. या शिवाय राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी देखील पाहायला मिळत आहे. काही भागात दिवसभर गार वारं जाणवतं तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान विभागाने काय म्हटलं?
अवघ्या महाराष्ट्रात नव्या वर्षाचा उत्साह पहायला मिळत असताना हवामान विभागाने काही भागात पावासाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकण या भागात झपाट्याने थंडी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात हवामानात (Weather Update) आणखी बदल होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे
वातावरणात परिणाम-
देशाच्या उत्तरेकडे तापमानात घट (Cold Wave) झाल्याचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावरही दिसून येत आहे. सध्या राज्यातील काही भागात थंडी जाणवते तर काही ठिकाणी थंडी कमी झालेली दिसत आहे.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. परिणामी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. मात्र गारठा कायम आहे. तर काही भागात पावसाचं कमबॅक होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
काही ठिकाणी पावसाची शक्यता-
एकीकडे गारठा सुरु असताना हवामान विभागाने काही ठिकाणी पावसाची शक्यता सांगितली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अहमदनगर, पुण्यात, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 2 जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
News Title : weather update rain alert in Maharashtra
थोडक्यात बातम्या-
Facebook, Instagram वापरताना काळजी घ्या, नाहीतर होणार अकाऊंट डिलीट; सरकारकडून नवे नियम लागू
Mutual Funds | म्युच्युअल फंडात गंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
क्रिकेट जगतात खळबळ!!! IPL खेळणारा ‘हा’ बडा क्रिकेटपटू बलात्काराच्या आरोपात दोषी, काय होणार शिक्षा?
Malaika Arora नं केली दुसऱ्या लग्नाची घोषणा… कोणासोबत लग्न करणार हे सुद्धा सांगितलं!
Entertainment News | ‘या’ बड्या अभिनेत्याची हत्या?; दिग्दर्शकाच्या पोस्टमुळे एकच खळबळ