पावसाबाबत हवामान खात्याचा मोठा अंदाज; ‘या’ भागात येलो अलर्ट जारी

Weather Update | मान्सूनचा हंगाम सुरू आहे. यंदा केरळ येथे मान्सून लवकर दाखल झाला. यामुळे यंदाच्या मान्सूनच्या हंगामात पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पोहोचत आहे. तर काही भागांमध्ये पावसाने दांडी मारलेली आहे. तर काही ठिकाणी पाऊस हुलकावणी देत असून ढगाळ वातावरण दिसत आहे. अशातच आता आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Weather Update)

‘या’ भागात येलो अलर्ट जारी

राज्यात कोकणसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणभाग आणि विदर्भात हवामान खात्याने मुसळधार पाऊसाची दाट शक्यता वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

दरम्यान भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातलं आहे. सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मोहाडीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तर भंडारा शहरातही पाऊस सुरूच आहे. यामुळे आता शेतकरी सुखावला आहे. याचा फायदा त्यांना शेतीसाठी होईल. लागवडीला वेग येणार असल्याची चिन्हे आहेत.

धाराशिव येथे पावसाचे वातावरण

धाराशिव येथे पावसाचे वातावरण आहे. त्याठिकाणी जोरदार पाऊस झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जोरदार पाऊस पडत आहे. प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली. तसेच पेरणी केल्याने या पावसाचा चांगला फायदा होऊ शकतो. यामुळे शेतकरी सुखावला आहे. (Weather Update)

तसेच काही भागात सुरूवातीला पाऊस झाला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊसच न झाल्याने पिके करपू लागली आहे. तर काही ठिकाणी पिकांची नासाडी होऊ लागली आहे. तसेच काहींच्या विहिरीला पाणी असेल तर त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याचा वापर आपल्या शेतीसाठी केला आहे. (Weather Update)

News Title – Weather Update Rainy Season in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “निवडणुकीआधीचा जुमला..”

वसंत मोरे ठाकरेंच्या वाटेवर?, ‘मातोश्री’वर आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर!

पावसाळ्यात चिकन-मटण खाताय?, मग ही बातमी वाचाच!

वाहनचालकांना दिलासा! ‘या’ शहरांत पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर