येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Update | गेल्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला. येथे अनेक नद्यांना पुर आला. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले. आता येथील पावसाचा जोर ओसरला आहे. येत्या काही तासात हाच पाऊस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर बरसताना दिसणार आहे. हवामान विभागाने याबाबत महत्वाचा इशारा दिला आहे. (Weather Update)

देशात सध्या राजस्थानपासून कमी दाबाच्या पट्ट्याचं एक क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वेला सक्रिय आहे. यामुळे कोकणासह राज्यातील घाटमाथ्यावर पाऊस जोरदार हजेरी लावताना दिसणार आहे. विदर्भात देखील मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.

कोणत्या भागांसाठी यलो अलर्ट?

हवामान विभागाने आज 4 सप्टेंबररोजी सातारा आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. (Weather Update)

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला

मराठवाड्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी आज पाऊस होऊ शकतो. येथे सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत मराठवाडा, विदर्भात पावसाने कहर केला होता. येथे पुरस्थिती निर्माण झाली होती. (Weather Update)

देशाबद्दल बोलायचं झाल्यास तेलंगणासह, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, असम, मेघालय, नगालैंड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

News Title :  Weather Update September 4

महत्वाच्या बातम्या-

“स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर शिवरायांचा पुतळा पडला नसता”

ढोल-ताशा वादकांसाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार, साताऱ्यातील घटनेनं मोठी खळबळ

‘या’ राशींवर होईल सुखाचा वर्षाव, नवीन कार्य करण्यास शुभ दिवस

क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार WTC 2025 फायनल! ICCकडून तारीख जाहीर