मुंबई | कडाक्याचा उन्हाळा सुरु असून नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. रखरखत्या उन्हामुळे अनेकांना बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागत आहे. यातच हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो तर कधी अवकाळी पावसाचा इशारा दिला जातो.
हवामान खात्यानं आता अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अदांजानुसार काही राज्यात मुसळधार तर काही राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई आणि शेजारील जिल्ह्यात दमट वातावरण होत असल्याने ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर जोरदार पावसाच्या वाऱ्यामुळे मच्छिमारांना 7 मे पर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड या भागात पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. येथे वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
‘जबरदस्तीने ओरल सेक्स करायचा’; प्रसिद्ध अभिनेत्यावर एक्स वाईफचा गंभीर आरोप
दिलासा मिळाल्यानंतरही राणा दाम्पत्यांच्या अडचणी कायम!
“भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला”
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला नवं वळण, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
रशियाची जपानवर मोठी कारवाई, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
Comments are closed.