Weather Update | थंडीत फिरायला अनेक लोकांना आवडतं. मात्र थंडीत फिरायला जायचं म्हटल्यावर अनेकजण घाबरतात. अनेकांना आजारी पडण्याची भिती असते. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस पडत होता. राज्यात आणि देशात वातावरणात (Weather) सतत बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी कुठे पाऊस पडतो, कुठे गारपीट होते. आता मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचं दिसतंय.
अनेक लोक थंडीत फिरायचा प्लॅन करत असतात. मात्र बदलत्या हवामानमुळे (Weather Update) लोक गोंधळलेत. अशात हवामान विभागाने पुढील 15 दिवस वातावरण कसं असेल याबाबत माहिती दिली आहे.
राज्यात पुढील दहा ते पंधरा दिवस वातावरण चांगलं असणार आहे. हवामान कोरडं असणार आहे. सुटीचं नियोजन आणि फिरायला जाण्यासाठी हा काळ चांगला आहे, असं हवामान विभागाने सांगितलं. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी याबाबत माहिती दिलीये.
Weather Update | “काही दिवस हवामान चांगलं असणार”
पुढील काही दिवस राज्यातील हवामान चांगलं असणार आहे. राज्यात कुठेही हवामान बदलाची शक्यता नाही, असं पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे. यामुळे तुम्ही सुट्टीला बाहेर फिरण्याचा प्लॅन करू शकता.
पुढील काही दिवस राज्यातील कमाल तापमान सामान्यापेक्षा कमी असणार आहे. चार ते पाच दिवस रात्री थंडी असणार आहे. यामुळे आता नाताळ आणि वर्षअखेरचा आनंद पर्यंटनस्थळी जाऊन बिनधास्तपणे घेता येणार आहे.
कमी खर्चात जाऊ शकता ‘या’ ठिकाणी
कर्नाटकातील कुर्ग (Coorg in Karnataka) हे हिवाळ्यात भटकंतीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. त्याला भारताचे स्कॉटलंड असेही म्हणतात. राजस्थानचे जैसलमेर (Jaisalmer) हिवाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Investment | मुलांच्या भविष्याचं असं करा प्लॅनिंग, वयाच्या विशीतच होईल करोडपती!
Hampi | अत्यंत कमीत कमी बजेटमध्ये हम्पीला कसे फिरुन यायचे?
Gautam Gambhir | प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या अडचणी वाढल्या, ‘या’ कारणामुळे होणार मोठी कारवाई?
INDvSA | दक्षिण आफ्रिका-भारत मालिकेपूर्वी मोठा झटका, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर
Fennel Seeds | जेवणानंतर बडीशेफ खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात?, जाणून थक्क व्हाल