Weather Updates | महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण पाहावयास मिळत आहे. असं असलं तरी काही ठिकाणी तापमान प्रचंड वाढत चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे कुठे ऊन तर कुठे पाऊस असं वातावरण सध्या महाराष्ट्रात तयार झालंय.
शनिवारी राज्यात धुळे आणि जळगावमध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, बऱ्याच ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भामध्ये याच्या उलट वातावरण निर्माण झालंय.
विदर्भ आणि मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
येथे उकाडा वाढणार
तर, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या हवेत आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हवेतील उकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात (Weather Updates) रविवारी आणि सोमवारी (19 आणि 20 मे) वातावरण उष्ण आणि दमटच राहील, असा अंदाज आहे.
‘या’ भागांना पावसाचा यलो अलर्ट
दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया (Weather Updates) आणि गडचिरोली येथे वादळी पावसाची शक्यता आहे.
अशात मान्सून देशात आणि महाराष्ट्रात कधी दाखल होणार, याची सर्वांना प्रतिक्षा आहे. 20 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल. त्यानंतर 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल. यानंतर 6 जून रोजी मान्सून तळ कोकणात दाखल होईल, असा अंदाज आहे.
News Title- Weather Updates in Maharashtra
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईला नमवत RCB प्लेऑफमध्ये; विराटला अश्रु अनावर, Video व्हायरल
‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून मोठा धनलाभ होईल!
रणवीरने दीपिकाला ठेवलं नवीन नाव, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
चाळीशी पार झाली तरी केलं नाही लग्न?; मुक्ता बर्वे स्पष्टच बोलली
‘राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार’, बड्या नेत्याचा मोठा दावा