बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

मुंबई | महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली असताना मुंबईची काही दिवसांआधी तुंबई झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. काल मुंबईतील पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. सध्या महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एक दिवस उसंत घेतल्यानंतर मुंबईतील पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना आज ग्रीन अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

दरम्यान, आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ, अकोला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सायन सर्कल, हिंदमाता, दादर, माटुंगा या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई जोरदार पाऊस सुरू असला तरी सध्या रस्ते वाहतूक आणि लोकल सुरळीतपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागातर्फे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या –

काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण

भारताची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट

‘दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केलीच नव्हती’; ‘या’ शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

कोट्यवधींच्या साखरेचं पावसाने मोठं नुकसान; तब्बल 30 हजार पोते भिजले

“ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल, तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More