इन्स्टाग्रामधील चूक दाखवून जयपुरच्या पठ्ठ्याने तब्बल 38 लाख रुपये मिळवले आहेत.

जयपुरच्या नीरज शर्माने इन्स्टाग्रामधील एक गंभीर बाब समोर आणलीय.

इन्स्टाग्राम रिल्समध्ये अशी एक त्रुटी आहे, ज्याचा फायदा घेऊन तिराहीत व्यक्ती एखाद्या युजरचे अकाऊंट हॅक करू शकते. 

तुम्ही रिल कधी डाऊनलोड केला असेल तर त्या रिलचं कव्हर पिक्चर ऑप्शन तुम्हाला दिसला असेल. याला थंबनेलही बोलतात.  

या थंबनेलचा वापर दुसऱ्या रिलसाठी सुद्धा सहजपणे केला जाऊ शकतो असं त्याचं म्हणणं होतं.

कंपनीने त्याला प्रात्यक्षिक करुन दाखवण्यास देखील सांगितलं, ते त्याने केवळ 5 मिनिटांत करून दाखवलं.  

या सगळ्या प्रकारानंतर त्या पठ्ठ्याला कंपनीतर्फे बोनससह तब्बल 38 लाख रुपये इनाम देण्यात आलाय.   

यावरुन सोशल मीडियामुळे कोणाचं नशीब कधी पलटेल हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.